Sunday, December 13, 2015

Reflection....तमाशा

तुम्ही एक सुंदर आणि eye pleasing लव्ह स्टोरी पाहण्यासाठी थेटर ला जाता. चित्रपट सुरु होतो अपेक्षित नायक, नायिका अतिशय रमणीय स्थळी भेटतात. गाणी romance मिलना बीछडना असे सगळ सुरु असतानाच चित्रपट अश्या एका मुद्द्याला हात घालतो अन तो सिनेमा फक्त सिनेमा राहत नाही तुम्हाला तुमच्या रोजच्याच जगण्याच प्रतिबिंब वाटू लागत. अन जाता जाता चित्रपट आपल्याला एक कमालीचा दृष्टीकोन, positiveness आणि आशावाद देऊन जातो. हे सगळ माझ्या सोबत तमाशा सिनेमा पाहताना तंतोतंत झालं.
आपण कित्तेकदा म्हणतो ना this is not my cup of tea or i am in very wrong profession , साला ये rat race कब खतम होगी, बास उद्या जाउन resign च करतो enough is enough. पण एक रात्र जाते अन आपण पुन्हा ५. ३० तासांची rat race मध्ये अव्वल येण्यासाठी धडपड करू लागतो. मग रेस मध्ये धावताना आपल्या जवळच्या लोकांना, नात्यांना एवढच काय स्वतःला ही आपण गमावतो. आपल्या आवडी निवडी, self respect, personal proprieties सगळ काही डावावर लावून आपल्याला हातात काय मिळत ??? काहीच नाही…  उलट दुप्पट रेस ने धावायचे, अधिक focus ने काम करायचे सल्ले.
चित्रपटा मधला नायक finally त्या rat  रेस मधून बाहेर पडतो ,जे त्याला शक्य झालं कारण तो सिनेमा आहे आणि तो नायक आहे so ultimately तो जिंकलाच पाहिजे.  अर्थात real आयुष्यात आपण असे तडका फडकी बाहेर नाही पडू शकत पण प्रयत्न तर नक्की करू शकतो ना. सगळ एकदम सोडण शक्य नाही पण रोजच्या किंवा आठवड्यात किमान एकदा सगळे मुखवटे उतरवून स्वतः साठी किंवा ज्यांना आपण "आपण "असण matter करत त्यांच्या साठी जगू शकतो.
जसा की मी खूप फिल्मी किंवा एखाद्या फिल्म ने पटकन influence होणारा पण मी असाच आहे, यात मला मनापासून आनंद मिळतो आणि मिळेल. एकदा तुमचा मुखवटा उतरवून तर पहा भारी वाटत ते…
चलो आज के लिये  इतना ही…
हम है राही प्यार के फिर मिलेंगे चलते चलते … आयुष्य सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवा…
अधीश

Sunday, March 23, 2014

Queen.....


Queen......

हा picture पहिल्या पासून यावर लिअहय्च ठरवलं होत. पण असे घाई गडबड करून, intitail thoughts वर न जाता नित विचार करून लिहायचं होत. आणि yess आज finally वेळ मिळाला. ह्या फिल्म च्या promo पासून च एक गोष्ट नक्की कळली होती ही काही typical punjabi wedding movie नक्कीच नसणारे यामागे एक वेगळी मजा आणि खूप interesting thought  असणारे. movie release झाल्या पासून च लोकांच्या FB updates आणि कट्ट्यावरच्या गप्पांनी या film ची उत्सुकता अगदी टिपेला पोचली होती. आणि finally मी last week मध्ये ही movie पहिली.
फिल्म ची story , मांडणी , picturisation , कंगना चा performance या सगळ्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून आवडल्या.पण सर्वात जास्त आवडला तो या फिल्म मागचा thought. आपल्या इथे कुठला ही विचार अथवा नवी concept लोकांना पचनी पडायची असेल तर ती  एका मुलीच्या भावविश्वा च्या माध्यमातून दाखवली कि ती audience ला पटकन कळते आणि भावतेही आणि इथे ही या film च्या team ने तेच केल आहे.
Thought  अतिशय साधा simple आहे कुठल्याही नव्या situation ला face करताना Be Blank & Be Positive. एका typical middle class साध्या घरातली मुलगी एका अनोळखी देशात जाते , झगडते, लढते , फुलते आणि स्वतःचे एक विश्व निर्माण करते किती सुंदर आणि मस्त प्रवास आहे हा. कायम कुणी मुलगी त्यात एकटी परदेशी जाणार म्हणल ४ चौघांच्या मनात पहिला विचार येणार अरे देवा !!! एकटी मुलगी !! परदेशात कस होणार हीच ?? तिचा कुणी गैरफायदा घेतला तर ?? तिकडे काय सगळा स्वैराचार च आहे. Free Sex  च्या नावाखाली काही वाट्टेल ते करतात हे लोक. पण foreign किंवा foreigner म्हणजे एवढच का ?? तिकडे चांगले लोक नसतात च का ?? ह्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत no doubt about that but its just part of their life and not heart of their life. पण कसय आपल्याला एक सोयीस्कर सवय लागली आहे आपण स्वतः कधी विचार न करता, actual परिस्थिती ला सामोर न जाता केवळ दुसर्याने सांगितलेल्या वाईट गोष्टी १००% मनावर कोरून ठेवतो बाकी मात्र सोयीस्कर पणे ignore करतो.
आणि हे सगळ आपल्या आयुष्यात कायम दररोज घडत असत मग ते नवा business  सुरु करताना असो, पठडी पेक्षा वेगळ career असो किंवा स्वताच्या वैयक्ती आयुष्यातला अगदी important decision घेण असो. Situation ला face न करताच आपण निष्कर्ष काढून biased होऊन ती situation handle करतो आणि मग मनासारखा न जगता आल्याबद्दल स्वताला आणि नशिबाला दोष देत बसतो
बापरे मी कुठून कुठे गेलो ना ??? पण खरच विचार करा अस घडत ना आपल्या आजूबाजूला?? मग ते थोड तरी बदलायला हव ना मग ???
म्हणून मला ही movie आवडली because its not a story of a girl its a story of life changing approach. So जर आपल्या आयुष्यावर थोडस जरी प्रेम करत असाल तर do watch  this movie because life is beautiful …. very very beautiful

Take  Care
अधीश 

Monday, December 30, 2013

हम आपके है कौन….


हम आपके है कौन….

२०१३ सरता सरता लग्नांचा season मात्र अगदी ऎन बहरा मध्ये आहे. म्हणजे real life मध्ये असंख्य लग्न होत असली तरी reel life मध्ये ही अनेक लग्नाच्या च कथा सुरु आहेत. परवाच एका लग्नात ( मराठमोळया  लग्नात ) स्वताचे बूट  वाचवत , चेंगरा चेंगरी सहन करत बोहल्यावर  चढताना एका नवरदेवाला पाहिले आणि मला या चित्रपटाची आठवण झाली. कारण ही जी काही "रसम" आपल्या इथल्या सगळ्या लग्नात सरसकट पणे आली आहे ती याच चित्रपटा मूळे. नाहीतर कुणाला माहित होत की नवर देवाच्या नाकी नऊ आणून ही "रसम " पार पाडायची असते.भारतीय जनमानसावर इतका प्रभाव केलेली अन्य कुठली फिल्म असेल अस मला तरी वाटत नाही.
मला आठवतंय हा सिनेमा release झाला होता तेव्हा मार्केट मध्ये माधुरी सारखा हिरवा पांढरा घागरा आणि मुलांसाठी सलमान सारखे jacket आले होते. मी आणि माझ्या बहिणीने ते घेण्यासाठी घर डोक्यावर घेतलं होत पण आमच्या पालकांनी काही आमचा बाल हट्ट पुरवला नाही. मग अश्या उदास अंतकरणाने जेव्हा आम्ही लग्नाला गेलो तेव्हा आम्हाला कळल कि already त्या लग्नात किमान २० माधुरी दिक्षित आणि १७ सलमान खान already तसेच कपडे घालून आले होते so लोकांसमोर भाव खाण्याचा आमचा plan कसा flop झाला असता याची आम्हाला जाणीव झाली आणि आम्ही मनोमन आई बाबांचे पहिल्यांदा आमचा हट्ट न पुरवण्या बद्दल आभार मानले.
या सिनेमांनी लग्न , नाती आणि त्याग या सगळ्या कडेच पाहायचा नवा दृष्टीकोन दिला आणि तो अजूनही आपल्यात जिवंत आहे. कुटुंबातील प्रत्येक घटकाला अगदी घराच्या नोकरालाही प्रेमाने बांधून ठेवणार कुटुंब आपल कधी होऊन गेल ते कळल देखील नाही.
या नंतर लग्नाच्या, नात्याच्या अनेक कथा रुपेरी पडद्यावर आल्या पण लग्नाच्या या कथेची सर अन्य कोणत्याही कथेला आली नाही आणि येणारही  नाही. जस या फिल्म च्या end ला दाखवलं आहे  की  हम आपके है  कौन नव्हे तर हम आपके है ते अगदी खर झाल आहे ही कथा काल्पनिक असली तरी प्रत्यक्षात आपली झाली आहे आणि राहील
चला आता पुढची भेट २०१४ मध्ये काही नव्या फिल्म्स त्याच्या गप्पा आणि आठवणी घेऊन तब तक याद रखना  हम आपके है … थे … और हमेशा रहेंगे

अधीश

Friday, August 16, 2013

दिल चाहता है….

दर साला बाद प्रमाणे काल १ ५  ऑगस्ट  झाला आणि या चित्रपटाची आठवण दर वर्षी प्रमाणे ताजी झाली. काल बरोबर १ २  वर्षे झाली हा सिनेमा पाहून आणि मी या विचारानेच थक्क झालो. १ ५ ऑगस्ट २ ० ० १   रोजी मी माझ्या जुनिअर कॉलेज च्या friends  बरोबर पाहिलेला हा पहिला सिनेमा. जेव्हा हा सिनेमा पाहून बाहेर पडलो तेव्हा एका कुठल्या तरी भन्नाट उर्जेने झपाटून बाहेर पडलो होतो. पहिल्यांदा एक so called youth सिनेमा आपलासा वाटला होता.
३ मित्र आपल्या सारखी टुकार गिरी करणारे तरीही  प्रेम, मैत्री आणि ambition याचा अनोखा अर्थ देणारे. पाहून वाटल साल आयुष्य असाव तर अस प्रेम असाच असाव, मैत्री अशीच असावी, passion  असावी तर अशी इतकच काय तर रोजची fashion ही असावी अशीच…त्यावेळी ( अस म्हणल  की अगदी आज्जी आजोबांची typical  आठवतात ) almost प्रत्येक alternate मुलगा  अमीर खान सारखी त्रिकोणी द्दधी ठेवायचा. तसेच कोल t shirts घालायचा…एवढच काय अजून ही Goa  ला जाणारा प्रत्येक जण  DCH च्या  त्या spot  वर  तसेच photo काढतो आणि FB वर upload  करतो. असो एक ना अनेक खूप काही आहे या फिल्म बद्दल लिहिण्या सारख.
In all या  film ने entertainment तर दिलीच पण सगळ्यात महत्वाच म्हणजे एक fresh approach आणि उत्साह दिला आणि तेच या फिल्म च यश आहे. ज्या मुळे  आजही ही फिल्म पहिली की तितकच fresh आणि rejuvenating  वाटत. खंत इतकीच वाटते की आपल्याला कधी ही किती डोळे मिटले तरी कोणत्याही गाण्याच्या चालीवर " ती" चा चेहरा दिसत नाही, दिसला तरी तीच लग्नात जाऊन आपण तिला मागणी घालत नाही, वयापेक्षा मोठ्या बाई कडे केवळ प्रेम भावनेने पाहत नाही, आणि एका वेगळ्या आणि mature angle ने मैत्री कडे पाहत नाही. असो पण हे कधी तरी आपण करू इसी उम्मीद पे दुनिया कायम हैं
देव करो अश्या फिल्म्स जास्तीत जास्त बनो.
चलो take care
अधीश  

Tuesday, June 4, 2013

Thanks जिया….


Thanks  जिया….
जिया खान कित्ती नशीबवान आहे ना प्रसार माध्यमांचा सुकाळ सुरु असताना गेली बिचारी. अथवा या आधीच्या अकाली मृत्युमुखी पडलेल्या अभिनेत्रींच्या नशिबी वर्तमान पत्रातील एखादा कोपरा आणि बातम्या मधले ३० - ३५  सेकंदाचा उल्लेख या पलीकडे काही मिळाल नाही. पण जिया खान ने त्यांच ही नशीब मरणोत्तर का होईना उजळवल आहे. आज सकाळ पासून मीनाकुमारीच्या व्यथा ते जिया खानच्या मृत्यू पूर्वीच्या प्रत्येक तासाच्या detailed कथा हे सगळ विविध channels नी किती सुरेख आणि रंजक पद्धतीने दाखवलं आहे की काय बोलाव ??? so जिया thank you  so much आज आम्हाला दिवस भर वेगेवगळे स्टार्स  छान  white outfilts मध्ये दिसले
एक मात्र बर्र झालं  या सगळ्यात नव्या होतकरू फिल्म makers ना hit फिल्म चा अजून एक आयत रसायन मिळाल. ज्या रीतीने silk स्मिता, परवीन  बाबी यांच्या व्यथा लोकांसमोर hit चित्रपटाच्या कथा बनून लोकांसमोर आल्या त्यात च ही अजून एक addition. एका hitt film ला लागणार सार रसायन असेल च कि या film मध्ये bold व्यक्तिमत्व , कमी वयात अधिक contraversial आयुष्य आणि अकाली, गूढ आणि नैराश्याने ग्रासलेला मृत्यू… बस काही सुरेख गाणी पेरली आणि अचूक publicity केली की मुर्ख जनता येतेच आहे अभिनेत्रीच्या मृत्यूच रहस्य पाहायला जिभल्या चाटत चाटत… अगदी हे सगळ जरी film मध्ये add केल नाही आणि वाट्टेल ती film करून " ही फिल्म अमुक अमुक अभिनेत्रीच्या सत्य घटनेवर आधारित आहे " एवढ label जरी चिकटवल तरी फिल्म चाललीच म्हणून समजा. so जिया once again thanks  to you कारण आम्हाला अजून एक दर्जा चित्रपट पाहायला मिळेल आणि जर त्याने १०० कोटींचा वगैरे धंदा केला तर सोने पे सुहागाच so पुन्हा एकदा मनापासून thanks…. 
कसल भारी आहे ना  हे filmstars आपल जगण फिल्मी बनवतात आणि आपण त्यांचा मृत्यू…….

Thursday, May 2, 2013

मोहरा

मोहरा ....

या फिल्म बद्दल माझ्या खूप खास आठवणी आहेत. तसा हा picture typical  सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार चा मारामारी मसाला movie  आहे. पण माझ्या आठवणी खूप वेगळ्या अर्थाने आहेत. या फिल्म मध्ये एक गाण  आहे "तू चीज बडी है  मस्त मस्त… हे गाण  त्या वेळेस तुफान hit झाल  होत. त्यातला अक्षय कुमार डोक्याला रुमाल बांधून, कानात मोठी रिंग घालून नाचणारा मला जाम आवडायचा. तू चीज बडी है  मस्त मस्त चा dance  मी हा हा म्हणता पिक उप केला. आणि मग घरात, पाहुण्यांच्यात आणि  नंतर काही गणपती मंडळात  मी या गाण्यावर dance  करायचो. तसाच रुमाल बांधायचो , बहिणीची प्लास्टिक ची बांगडी हलकीशी कापून रिंग म्हणून घालायचो आणि मग काय सगळीकडून कौतुक व्हायचं 
असाच मी एकदा घरापासून दूर एका नवरात्री मंडळात dance करायला  गेलो. अगदी आवरून सावरून आणि तिथे जाउन पाहतो काय तर तिथे हुबेहूब अक्षय कुमार सारखे कपडे घालून काहीसा माझ्या पेक्षा मोठा मुलगा already तयार होता आणि अचानक आयोजकांनी माझा पत्ता कट  केला आणि त्याला संधी दिली.भरीस  भर म्हणजे त्याला जोडीला एक मुलगी होती जिने हुबेहूब रविना टंडन सारखे कपडे घातले होते. माझ्या संतापाचा कडेलोट झाला जेव्हा त्या दोघांनी अतिशय अप्रतिम dance  करून तिथल्या लोकाकडून once more  मिळवला  आणि cash prize  ही
या सिनेमा मूळे अनेक भावनाशी ओळख झाली स्पर्धा, नकार, नैराश्य आणि सर्वात महत्वाच म्हणजे मत्सर… ज्या भावना कुणी शिकवू शकत नाही त्या अनुभावाव्याच लागतात… म्हणूनच मी कायम म्हणतो झीन्दगी साली फिल्मी है… 

Monday, April 8, 2013

मिस्टर इंडिया


मिस्टर इंडिया 
जिंदगी सारी फिल्मी है....
या blog  मध्ये पहिल्यांदा  कुठल्या फिल्म बद्दल लिहायचा असा विचार आला आणि क्षणाचाही विलंब  न करता माझ्या डोळ्यासमोर पाहिलं नाव आल ते या सिनेमाच ज्याच नाव आहे मिस्टर इंडिया . लहानपणी काय? अन मोठयापणी काय ? ह्या  सिनेमांनी वेड  न लावलेला माणूस  आज वर तरी माझ्या संपर्कात नाही. 
काय  सिनेमा आहे ना ? जबरदस्त Concept   अफलातून Entertainment आणि तितकाच एका moment  ला टचकन डोळ्यांत  पाणी आणणारा हा सिनेमा. माझ्या अनेक आठवणी या सिनेमा बरोबर. मला समजायला लागल तेव्हा पासून जेव्हा जेव्हा हा सिनेमा TV  वर लागायचा तेव्हा तेव्हा मी तोंड आ वासून हा सिनेमा पाहायचो जेवताना हात वाळून जायचा तरी मी सिनामात च दंग असायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत कितीदा बाबांचं gold plated घड्याळ घेऊन मी मिस्टर इंडिया बनायचो, भूक लागली की मी आणि माझी बहिण बाबांना म्हणायाचो  "अरून भाया  भूक लागी हैं अरून भाया", माझ्या बहिण तर एकदा शाळेत fancy ड्रेस स्पर्धे मध्ये डोक्याच्या कॅप ला फळे बांधून मिस हवाहवाई  झाली होती....  त्या वेळेला टीनाचा मरायचा सीन आला की खूप वाईट वाटायचं तर श्रीदेवी आणि अनिल कपूरच I Love You  गाण आई बाबा नि आम्हाला कधी पाहू दिल नाही 
आता त्याची खूप मजा वाटतेय... आज जेव्हा प्रगल्भ होऊन हा सिनेमा पाहतो तेव्हा टीना च्या सीन ला डोळे भरत नाहीत,I Love You  गाण खुल्लम खुलला पाहतो.. पण त्या वेळेला पहायची ती curiosity  आता  नाहीये. कदचित मिस्टर इंडिया  जसा गायब व्ह्याचा तसा आयुष्यातला तो Innocence  कुठे तरी गायब झाला आहे आणि आमच्या कडे कुठली लाल काच हि नाही ज्याच्यातून डोकावून तो आम्हाला पुन्हा दिसेल.......
जिंदगी साली बोहोत फिल्मी है.......