Thanks जिया….
जिया खान कित्ती नशीबवान आहे ना प्रसार माध्यमांचा सुकाळ सुरु असताना गेली बिचारी. अथवा या आधीच्या अकाली मृत्युमुखी पडलेल्या अभिनेत्रींच्या नशिबी वर्तमान पत्रातील एखादा कोपरा आणि बातम्या मधले ३० - ३५ सेकंदाचा उल्लेख या पलीकडे काही मिळाल नाही. पण जिया खान ने त्यांच ही नशीब मरणोत्तर का होईना उजळवल आहे. आज सकाळ पासून मीनाकुमारीच्या व्यथा ते जिया खानच्या मृत्यू पूर्वीच्या प्रत्येक तासाच्या detailed कथा हे सगळ विविध channels नी किती सुरेख आणि रंजक पद्धतीने दाखवलं आहे की काय बोलाव ??? so जिया thank you so much आज आम्हाला दिवस भर वेगेवगळे स्टार्स छान white outfilts मध्ये दिसले
एक मात्र बर्र झालं या सगळ्यात नव्या होतकरू फिल्म makers ना hit फिल्म चा अजून एक आयत रसायन मिळाल. ज्या रीतीने silk स्मिता, परवीन बाबी यांच्या व्यथा लोकांसमोर hit चित्रपटाच्या कथा बनून लोकांसमोर आल्या त्यात च ही अजून एक addition. एका hitt film ला लागणार सार रसायन असेल च कि या film मध्ये bold व्यक्तिमत्व , कमी वयात अधिक contraversial आयुष्य आणि अकाली, गूढ आणि नैराश्याने ग्रासलेला मृत्यू… बस काही सुरेख गाणी पेरली आणि अचूक publicity केली की मुर्ख जनता येतेच आहे अभिनेत्रीच्या मृत्यूच रहस्य पाहायला जिभल्या चाटत चाटत… अगदी हे सगळ जरी film मध्ये add केल नाही आणि वाट्टेल ती film करून " ही फिल्म अमुक अमुक अभिनेत्रीच्या सत्य घटनेवर आधारित आहे " एवढ label जरी चिकटवल तरी फिल्म चाललीच म्हणून समजा. so जिया once again thanks to you कारण आम्हाला अजून एक दर्जा चित्रपट पाहायला मिळेल आणि जर त्याने १०० कोटींचा वगैरे धंदा केला तर सोने पे सुहागाच so पुन्हा एकदा मनापासून thanks….
कसल भारी आहे ना हे filmstars आपल जगण फिल्मी बनवतात आणि आपण त्यांचा मृत्यू…….
