Sunday, December 13, 2015

Reflection....तमाशा

तुम्ही एक सुंदर आणि eye pleasing लव्ह स्टोरी पाहण्यासाठी थेटर ला जाता. चित्रपट सुरु होतो अपेक्षित नायक, नायिका अतिशय रमणीय स्थळी भेटतात. गाणी romance मिलना बीछडना असे सगळ सुरु असतानाच चित्रपट अश्या एका मुद्द्याला हात घालतो अन तो सिनेमा फक्त सिनेमा राहत नाही तुम्हाला तुमच्या रोजच्याच जगण्याच प्रतिबिंब वाटू लागत. अन जाता जाता चित्रपट आपल्याला एक कमालीचा दृष्टीकोन, positiveness आणि आशावाद देऊन जातो. हे सगळ माझ्या सोबत तमाशा सिनेमा पाहताना तंतोतंत झालं.
आपण कित्तेकदा म्हणतो ना this is not my cup of tea or i am in very wrong profession , साला ये rat race कब खतम होगी, बास उद्या जाउन resign च करतो enough is enough. पण एक रात्र जाते अन आपण पुन्हा ५. ३० तासांची rat race मध्ये अव्वल येण्यासाठी धडपड करू लागतो. मग रेस मध्ये धावताना आपल्या जवळच्या लोकांना, नात्यांना एवढच काय स्वतःला ही आपण गमावतो. आपल्या आवडी निवडी, self respect, personal proprieties सगळ काही डावावर लावून आपल्याला हातात काय मिळत ??? काहीच नाही…  उलट दुप्पट रेस ने धावायचे, अधिक focus ने काम करायचे सल्ले.
चित्रपटा मधला नायक finally त्या rat  रेस मधून बाहेर पडतो ,जे त्याला शक्य झालं कारण तो सिनेमा आहे आणि तो नायक आहे so ultimately तो जिंकलाच पाहिजे.  अर्थात real आयुष्यात आपण असे तडका फडकी बाहेर नाही पडू शकत पण प्रयत्न तर नक्की करू शकतो ना. सगळ एकदम सोडण शक्य नाही पण रोजच्या किंवा आठवड्यात किमान एकदा सगळे मुखवटे उतरवून स्वतः साठी किंवा ज्यांना आपण "आपण "असण matter करत त्यांच्या साठी जगू शकतो.
जसा की मी खूप फिल्मी किंवा एखाद्या फिल्म ने पटकन influence होणारा पण मी असाच आहे, यात मला मनापासून आनंद मिळतो आणि मिळेल. एकदा तुमचा मुखवटा उतरवून तर पहा भारी वाटत ते…
चलो आज के लिये  इतना ही…
हम है राही प्यार के फिर मिलेंगे चलते चलते … आयुष्य सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवा…
अधीश