मोहरा ....
या फिल्म बद्दल माझ्या खूप खास आठवणी आहेत. तसा हा picture typical सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार चा मारामारी मसाला movie आहे. पण माझ्या आठवणी खूप वेगळ्या अर्थाने आहेत. या फिल्म मध्ये एक गाण आहे "तू चीज बडी है मस्त मस्त… हे गाण त्या वेळेस तुफान hit झाल होत. त्यातला अक्षय कुमार डोक्याला रुमाल बांधून, कानात मोठी रिंग घालून नाचणारा मला जाम आवडायचा. तू चीज बडी है मस्त मस्त चा dance मी हा हा म्हणता पिक उप केला. आणि मग घरात, पाहुण्यांच्यात आणि नंतर काही गणपती मंडळात मी या गाण्यावर dance करायचो. तसाच रुमाल बांधायचो , बहिणीची प्लास्टिक ची बांगडी हलकीशी कापून रिंग म्हणून घालायचो आणि मग काय सगळीकडून कौतुक व्हायचं
असाच मी एकदा घरापासून दूर एका नवरात्री मंडळात dance करायला गेलो. अगदी आवरून सावरून आणि तिथे जाउन पाहतो काय तर तिथे हुबेहूब अक्षय कुमार सारखे कपडे घालून काहीसा माझ्या पेक्षा मोठा मुलगा already तयार होता आणि अचानक आयोजकांनी माझा पत्ता कट केला आणि त्याला संधी दिली.भरीस भर म्हणजे त्याला जोडीला एक मुलगी होती जिने हुबेहूब रविना टंडन सारखे कपडे घातले होते. माझ्या संतापाचा कडेलोट झाला जेव्हा त्या दोघांनी अतिशय अप्रतिम dance करून तिथल्या लोकाकडून once more मिळवला आणि cash prize ही
या सिनेमा मूळे अनेक भावनाशी ओळख झाली स्पर्धा, नकार, नैराश्य आणि सर्वात महत्वाच म्हणजे मत्सर… ज्या भावना कुणी शिकवू शकत नाही त्या अनुभावाव्याच लागतात… म्हणूनच मी कायम म्हणतो झीन्दगी साली फिल्मी है…
.jpg)
No comments:
Post a Comment