मिस्टर इंडिया
जिंदगी सारी फिल्मी है....
या blog मध्ये पहिल्यांदा कुठल्या फिल्म बद्दल लिहायचा असा विचार आला आणि क्षणाचाही विलंब न करता माझ्या डोळ्यासमोर पाहिलं नाव आल ते या सिनेमाच ज्याच नाव आहे मिस्टर इंडिया . लहानपणी काय? अन मोठयापणी काय ? ह्या सिनेमांनी वेड न लावलेला माणूस आज वर तरी माझ्या संपर्कात नाही.
काय सिनेमा आहे ना ? जबरदस्त Concept अफलातून Entertainment आणि तितकाच एका moment ला टचकन डोळ्यांत पाणी आणणारा हा सिनेमा. माझ्या अनेक आठवणी या सिनेमा बरोबर. मला समजायला लागल तेव्हा पासून जेव्हा जेव्हा हा सिनेमा TV वर लागायचा तेव्हा तेव्हा मी तोंड आ वासून हा सिनेमा पाहायचो जेवताना हात वाळून जायचा तरी मी सिनामात च दंग असायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत कितीदा बाबांचं gold plated घड्याळ घेऊन मी मिस्टर इंडिया बनायचो, भूक लागली की मी आणि माझी बहिण बाबांना म्हणायाचो "अरून भाया भूक लागी हैं अरून भाया", माझ्या बहिण तर एकदा शाळेत fancy ड्रेस स्पर्धे मध्ये डोक्याच्या कॅप ला फळे बांधून मिस हवाहवाई झाली होती.... त्या वेळेला टीनाचा मरायचा सीन आला की खूप वाईट वाटायचं तर श्रीदेवी आणि अनिल कपूरच I Love You गाण आई बाबा नि आम्हाला कधी पाहू दिल नाही
आता त्याची खूप मजा वाटतेय... आज जेव्हा प्रगल्भ होऊन हा सिनेमा पाहतो तेव्हा टीना च्या सीन ला डोळे भरत नाहीत,I Love You गाण खुल्लम खुलला पाहतो.. पण त्या वेळेला पहायची ती curiosity आता नाहीये. कदचित मिस्टर इंडिया जसा गायब व्ह्याचा तसा आयुष्यातला तो Innocence कुठे तरी गायब झाला आहे आणि आमच्या कडे कुठली लाल काच हि नाही ज्याच्यातून डोकावून तो आम्हाला पुन्हा दिसेल.......
जिंदगी साली बोहोत फिल्मी है.......

No comments:
Post a Comment