Monday, December 30, 2013

हम आपके है कौन….


हम आपके है कौन….

२०१३ सरता सरता लग्नांचा season मात्र अगदी ऎन बहरा मध्ये आहे. म्हणजे real life मध्ये असंख्य लग्न होत असली तरी reel life मध्ये ही अनेक लग्नाच्या च कथा सुरु आहेत. परवाच एका लग्नात ( मराठमोळया  लग्नात ) स्वताचे बूट  वाचवत , चेंगरा चेंगरी सहन करत बोहल्यावर  चढताना एका नवरदेवाला पाहिले आणि मला या चित्रपटाची आठवण झाली. कारण ही जी काही "रसम" आपल्या इथल्या सगळ्या लग्नात सरसकट पणे आली आहे ती याच चित्रपटा मूळे. नाहीतर कुणाला माहित होत की नवर देवाच्या नाकी नऊ आणून ही "रसम " पार पाडायची असते.भारतीय जनमानसावर इतका प्रभाव केलेली अन्य कुठली फिल्म असेल अस मला तरी वाटत नाही.
मला आठवतंय हा सिनेमा release झाला होता तेव्हा मार्केट मध्ये माधुरी सारखा हिरवा पांढरा घागरा आणि मुलांसाठी सलमान सारखे jacket आले होते. मी आणि माझ्या बहिणीने ते घेण्यासाठी घर डोक्यावर घेतलं होत पण आमच्या पालकांनी काही आमचा बाल हट्ट पुरवला नाही. मग अश्या उदास अंतकरणाने जेव्हा आम्ही लग्नाला गेलो तेव्हा आम्हाला कळल कि already त्या लग्नात किमान २० माधुरी दिक्षित आणि १७ सलमान खान already तसेच कपडे घालून आले होते so लोकांसमोर भाव खाण्याचा आमचा plan कसा flop झाला असता याची आम्हाला जाणीव झाली आणि आम्ही मनोमन आई बाबांचे पहिल्यांदा आमचा हट्ट न पुरवण्या बद्दल आभार मानले.
या सिनेमांनी लग्न , नाती आणि त्याग या सगळ्या कडेच पाहायचा नवा दृष्टीकोन दिला आणि तो अजूनही आपल्यात जिवंत आहे. कुटुंबातील प्रत्येक घटकाला अगदी घराच्या नोकरालाही प्रेमाने बांधून ठेवणार कुटुंब आपल कधी होऊन गेल ते कळल देखील नाही.
या नंतर लग्नाच्या, नात्याच्या अनेक कथा रुपेरी पडद्यावर आल्या पण लग्नाच्या या कथेची सर अन्य कोणत्याही कथेला आली नाही आणि येणारही  नाही. जस या फिल्म च्या end ला दाखवलं आहे  की  हम आपके है  कौन नव्हे तर हम आपके है ते अगदी खर झाल आहे ही कथा काल्पनिक असली तरी प्रत्यक्षात आपली झाली आहे आणि राहील
चला आता पुढची भेट २०१४ मध्ये काही नव्या फिल्म्स त्याच्या गप्पा आणि आठवणी घेऊन तब तक याद रखना  हम आपके है … थे … और हमेशा रहेंगे

अधीश

No comments:

Post a Comment